काँग्रेस नेत्याने म्हटले राहूल गांधी शहीद झाले !

काँग्रेस नेत्याने म्हटले राहूल गांधी शहीद झाले !

काँग्रेस एका नेत्याने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांना शहीद म्हटल्याचा व्हिडिओ सध्या फेसबुकवर व्हायरल झाला आहे. यामध्ये भाषणाच्या आवेशात काँग्रेस नेत्याने राहुल गांधी यांना चक्क शहीद म्हटले आहे. फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत काँग्रेसचा एक नेता जनतेला संबोधित करताना दिसत आहे. ‘देशासाठी श्रीमती इंदिरा गांधी शहीद झाल्या. राहुलजी शहीद झाले आहे,’ असे या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेता बोलताना दिसतो आहे.

यानंतर एका व्यक्तीने राहुल गांधी अद्याप जिवंत असल्याचे भाषण करत असलेल्या नेत्याच्या लक्षात आणून दिले. या व्हिडिओतून भाषण करत असलेल्या नेत्याची नेमकी ओळख पटलेली नाही. सुशांत सिन्हा नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. ‘काँग्रेसच्या नेत्यांनाच राहुल गांधी जिवंत आहेत की नाही, माहित नाही,’ असे सुशांत सिन्हा यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे. 16 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे.

 

COMMENTS