काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलजवळ स्फोट झाल्याची घटना घडली. या बॉम्बस्फोटा आतापर्यंत 49 जण ठार झाले असून, 300 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. राष्ट्रपतींचे निवासस्थान आणि विविध देशांचे दूतावास असलेल्या परिसरातील एका कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे भारतीय दुतावासाचेदेखील नुकसान झाले आहे. सुदैवाने भारतीय दुतावासातील सर्व कर्मचारी सुखरुप आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी काबूलजवळ झालेल्या स्फोटाची तीव्रता अतिशय जास्त आहे. स्फोटाच्या आवाजामुळे शंभर मीटरवरील घरांच्या काचा फुटल्या आणि दरवाजेदेखील उखडले गेले आहेत. यानंतर घटनास्थळी धुराचे लोट निर्माण झाले.
COMMENTS