समृद्धी महामार्गाच्या विरोधात शिवसेनेचा रास्तारोको

समृद्धी महामार्गाच्या विरोधात शिवसेनेचा रास्तारोको

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात आज शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केलं. औरंगाबाद शहराजवळ असलेल्या जालना रोडवरील कॅंब्रिज चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समृद्धी नव्हेच.. बरबादी मार्ग… अशी फलक हातात घेऊन या महामार्गाचा तीव्र विरोध केला.

शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागा समृद्धी महामार्गसाठी पोलीस बळाचा वापर करून सरकार बळकावत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जबरदस्त विरोध सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वीच औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी उद्धव यांच्या जवळ शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली होती. त्यावेळी शिवसेनेनं तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर आज शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको केला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.

राज्यातील दहा जिल्ह्यातून नागपूर -मुंबई समृद्धी महामार्ग जाणार आहे. यामध्ये 30 तालुके, 354 गावातील रस्ता आणि नवनगरांसाठी 20 हजार 820 हेक्‍टर जमीन संपादीत केली जाणार आहे. यासाठी 46 हजार कोटी रुपये लागतील एवढी मोठी रक्कम कोठून उभारली जाणार आहे असा सवाल आंदोलकांनी उपस्थितीत यावेळी उपस्थित केला.

 

COMMENTS