कामकाज तहकूब करून विधीमंडळात फुटबॉल मॅच, मुख्यमंत्र्यांची कॉमेंट्री !

कामकाज तहकूब करून विधीमंडळात फुटबॉल मॅच, मुख्यमंत्र्यांची कॉमेंट्री !

दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करून आमदार फुटबॉल मॅच मध्ये दंग झाले होते.  क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी विधानभवनाच्या आवारात मॅटवरील फुटबॉल सामना आयोजित केला होता.

अधिवेशनाच्या कामकाजातून थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानभवनच्या पार्किंग एरियामध्ये हा फुटबॉल सामना खेळवण्यात आला. सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 म्हणजेच विधानसभा विरुद्ध विधानपरिषद असा हा सामना होता. दोन्ही टीममध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार खेळाडूंचा समावेश आहे. तर या सामन्यासाठी समालोचन चक्क मुख्यमंत्र्यांनी केलं. तर तावडे या सामन्यात रेफ्री होते.रामराजे नाईक निंबाळकर (सभापती 11) यांच्या संघानं नाणेफेक जिंकली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ केला. या सामन्यावेळी बरंच खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळाल.

 

COMMENTS