कार आणि बाईकवाले भुकेने तर तडफडत नाहीत ना , इंधन दरवाढीवरुन भाजपचे मंत्री घसरले !

कार आणि बाईकवाले भुकेने तर तडफडत नाहीत ना , इंधन दरवाढीवरुन भाजपचे मंत्री घसरले !

पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणा-या दरवाढीवरुन जनता त्रस्त आहे. त्यांना दिलासा देणं तर दूरच पण भाजपच्या मंत्र्यांनी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. विरोधाकांच्या प्रखर विरोध आणि जनतेची नाराजी यामुळे भाजपच्या मंत्र्यांचा संयम सुटू लागला आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे कार आणि बाईकवाले भुकेने तर तडफडत नाहीत ना असा अजब सवाल केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स कन्नथानम यांनी केला आहे.

ज्याच्या घरात कार किंवा बाईक आहे. तोच पेट्रोल डिझेल खरेदी करतो. त्याची ती क्षमता आहे. तो काही भुकेने तडफडत नाही. त्याला इंधननाचे दर माहित आहेत. आणि त्याला ते महागडे इंधन खरेदी करणे परवडते. त्याला ते करावेच लागेल असंही मंत्री म्हणाले. इंधनावरील टॅक्समुळे आंतरराष्ट्रीय बाजारात  तेलाच्या किमती कमी होऊनही सरकार इंधनाचे दर कमी करत नसल्याचा सरकारवर आरोप होत आहे. सरकार गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे श्रीमंतावर टॅक्स लावत आहे असं सागंत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचं समर्थन केलं.

COMMENTS