कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून स्थगिती

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून स्थगिती

भारताचे माजी नैसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने स्थगिती दिली आहे. पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. 

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना लिहलेल्या पत्रात जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाने पाकिस्तानला चपराक बसली आहे.

 

गेल्याच महिन्यात जाधव यांच्या आईने पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती. पाकिस्तानमधील भारतीय दूतावासाने आतापर्यंत 16 वेळा जाधव यांची भेट घेण्याची विनंती पाकिस्तानकडे केली आहे. पाकिस्तानने ही विनंती मान्य केली नाही.

 

COMMENTS