माजी मंत्री ए.टी. पवार यांचे मुंबईत निधन

माजी मंत्री ए.टी. पवार यांचे मुंबईत निधन

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन तुकाराम पवार यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.

गेल्या काही काळापासून ए. टी. पवार यांची प्रकृती खालावली होती. आठ दिवसांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कळवण मतदारसंघातून 8 वेळा विधानसभेवर निवडून गेलेले. ए. टी. पवार यांनी आदिवासी भागात अनेक लोकोपयोगी काम केली होती. त्यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता दळवट, ता. कळवण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेली 4 दशके कळवणच्या सार्वजनिक कार्यात चतुरस्त्र व्यक्तीमत्व म्हणून ए. टी. पवार यांच नावलौकिक होते. विकासपुरुष व पाणीदार नेता म्हणून मतदारसंघात ओळख त्याची ओळख होती. स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालयाची स्थापना करण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.

कळवण म्हणजेच ए.टी.पवार आणि ए. टी. पवार म्हणजेच कळवण अशी ओळख निर्माण करणारे आपल्या कार्यकर्तृत्वावर इतिहास निर्माण करणारे विधानसभेतील ज्येष्ठ  सदस्य ए. टी. पवार यांचीसाधी राहणी, निगर्वी विचारसरणी व दळवट ते मुंबई असा राजकीय प्रवास करतांना अनेक राजकीय पदे सांभाळत प्रामाणिकपणे त्याला न्याय देणारे असं त्याचा व्यक्तीमत्व होतं. कमी बोलणे व केवळ हात जोडून विकास कामांना चालना देणारा दादासाहेबांसारखा नेता कळवण तालुका नव्हे तर जिल्ह्यासह महाराष्ट्राने आज गमावला आहे.

 

COMMENTS