कुलभूषण यांना पाकमधून नव्हे तर इराणमधून अटक!

कुलभूषण यांना पाकमधून नव्हे तर इराणमधून अटक!

भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना इराणमधूनच अटक करण्यात आल्याची माहिती खुद्द आयएसआयचे माजी अधिकारी आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल अमजद शोएब यांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून अटक करण्यात आल्याचा पाकने दावा केला होतो. भारताने कुलभूषण प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. आता न्यायालयातील पुढील सुनावणीत शोएब यांच्या वक्तव्य भारतासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागताना खूप उपयोगी येणार आहे. यामुळे जगासमोर पाकिस्तानच्या खोटारडेपणा उघड होईल.

COMMENTS