कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत रुग्णालयात दाखल

कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत रुग्णालयात दाखल

पुणे – राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने आज (गुरुवार) पहाटे त्यांना ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

आज पहाटे खोत यांना उलट्यांचा त्रास झाला त्यानंतर त्यांना चक्करही येत होती. तसेच मानदुखीचाही त्रास होत होता. त्यामुळे तातडीने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या सदाभाऊ खोत यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान,’ ते राज्य कृषी पणन मंडळातील आढावा बैठक व अन्य कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी रात्रीच पुण्यात आले होते. मात्र पहाटे त्यांची अचानक तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळं त्यांचे आजचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले.

COMMENTS