कॅबिनेटमध्ये काजू, बदाम खायचे, बाहेर टीका करायची, अजित पवारांचा सेनेवर हल्लाबोल

कॅबिनेटमध्ये काजू, बदाम खायचे, बाहेर टीका करायची, अजित पवारांचा सेनेवर हल्लाबोल

रत्नागिरी – विरोधी पक्षांची संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा सध्या सुरू आहे. या दौ-यात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपबरोबर शिवसेनेवरही हल्लाबोल केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल पेट्रोल डिझेलवर अधिभार लावण्याचा आणि  रक्ताच्या नात्यातील संपत्ती हस्तांतरणासाठी पैसे मोजावे लागतील असे दोन निर्णय झाले. मात्र बैठकीतून बाहेर येताच शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हे दोन्ही निर्णय शिवसेनाला मान्य नसून सरकारने ते मागे घ्यावे अन्य़था शिवसेना रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा दिला होता. शिवसेनेच्या या भूमिकेवर अजित पवार यांनी सडकून टीका केली. शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, काजू, बदाम वर ताव मारतात आणि बाहेर येताच सराकरने आम्हाला अंधारात ठेवले, आम्हाला हा निर्णय मान्य नाही अशी टीका करतात. मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेची एक भूमिका असते आणि बाहेर एक भूमिका असते, शिवसेनेचा हा निव्वळ दुट्टपीपणा असल्याची टीकाही अजित  पवार यांनी केली.

 

संघर्ष यात्रेत कोण काय म्हणाले ?

पृथ्वीराज चव्हाण

सरकार शेतक-यांच्या प्रश्नावर गंभीर नाही, शेतकऱयांची टिंगल सुरु आहे. आश्वासनं द्यायची आणि विसरून जायचं असं सरकारचं सुरू आहे. तूर घोटाळ्याला जबाबदार कोण आहे ? त्याची शिक्षा शेतक-यांना का ?

 

राधाकृष्ण विखे पाटील

सरकारची अभ्यास करण्याची वेळ संपली आहे. आता  इतर राज्यांप्रमाणे कर्जमाफी करा. शिवराळ यात्रा सुरु करा – शिवसेनेला टोला राज्याच्या जनतेशी शिवसेनेची नियत खरी असेल तर त्यांनी तातडीने सत्तेतून बाहेर पडून रस्त्यावर उतरून संघर्ष करावा.

COMMENTS