केंद्राच्या तिजोरीत 92 हजार 283 कोटी रुपयांचा ‘जीएसटी’

केंद्राच्या तिजोरीत 92 हजार 283 कोटी रुपयांचा ‘जीएसटी’

नवी दिल्ली – जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर  केंद्र सरकारच्या तिजोरीत आतापर्यंत 92 हजार 283 कोटी रुपये जमा झाले आहेत. एकूण करदात्यांकडून जमा झालेला हा महसूल 64.4 टक्के इतका असल्‍याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

जेटली म्‍हणाले की, ‘1 जुलैपासून जीएसटी पर्वास प्रारंभ झाला. नव्या करप्रणालीनंतर सुमारे 60 लाख करदात्यांनी 92 हजार 283 कोटी रुपयांचा जीएसटी भरला आहे. यामध्ये 14 हजार 894 कोटी रुपये हे केंद्राच्या करातून मिळाले आहेत. तर, २२ हजार ७२२ कोटी रुपये हे राज्यांच्या करातून मिळाले आहेत. तसेच एकात्मिक करातून 47 हजार 469 कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे. त्याचबरोबर 7 हजार 198 कोटी रुपयांचा महसूल हा भरपाई उपकरातून मिळाला आहे.’

 

 

COMMENTS