दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे. त्याबाबतची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपसह मित्र पक्ष जेडीयूमधील दोन मंत्री शपथ घेणार असल्याचं कळतंय. तसच अण्णा द्रमुकचेही खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समजंय. मात्र जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला अजून याबाबत विचारणा झाली नाही अशी माहिती शिवसेनेत्या सूत्रांनी दिली आहे.
या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेलाही एखादे मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. दोन्ही पक्षात वाढलेल्या विसंवादामुळे अजूनतरी शिवसेनेला कळवण्यात आलेले नाही. दोन नवे मित्र पक्ष मिळाल्यामुळे भाजपकडून शिवसेनेला होल्डवर ठेवल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे आता शिवसेना स्वत:हून भाजपकडे मंत्रिपदे मागणार का ते पहावं लागेल.
COMMENTS