ग्रामपंचायत निवडणूकीत राजकीय चिन्हांचा वापर होणार नाही !

ग्रामपंचायत निवडणूकीत राजकीय चिन्हांचा वापर होणार नाही !

राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 7 हजार 576 ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यात ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचाही समावेश आहे. यावर्षी सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारांना राजकीय पक्षांच्या चिन्हाचं वाटप केले जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीही निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला जाणार असून राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

 

 

COMMENTS