केडीएमसीमध्ये आयुक्त कार्यालयातील राड्याप्रकरणी 25 जणांवर गुन्हे दाखल

केडीएमसीमध्ये आयुक्त कार्यालयातील राड्याप्रकरणी 25 जणांवर गुन्हे दाखल

कल्याण –  शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात केलेल्या राड्याप्रकरणी 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 2 वर्षे उलटूनही प्रभागात कामे होत नसल्याचे सांगत शिवसेनेच्या संतप्त नगरसेवक आणि नगरसेविकांनी आयुक्त कार्यालयावर काल हल्लाबोल केला. त्यात आयुक्त हटावच्या घोषणाबाजीसह आयुक्तांची खुर्चीही भिरकावण्यात आली होती.

गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये 17 महिला नगरसेविकांसह 8 नगरसेवकांचा समावेश आहे. याप्रकरणी काल रात्री उशिराने बाजारपेठ पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, दशरथ घाडीगांवकर, प्रकाश पेणकर, सुधीर बासरे, मोहन उगले,गणेश कोट, छाया वाघमारे,  माजी महापौर वैजयंती घोलप,सोनी अहिरे, शालिनी वायले, रजनी मुरकुटे, मनीषा तारे, नीलिमा पाटील, प्रियंका भोईर, मीना जाधव, गुलाब म्हात्रे, पूजा म्हात्रे, लाजवंती मढवी, सुशीला माळी, संगीता गायकवाड, प्रेमा म्हात्रे, आशा लता बाबर, शकीला खान यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती बाजरपेठ पोलिसांनी दिली.

या सर्वांवर आयपीसी 142, 143, 145, 146, 147, 149 आणि पोलीस अधिनियम – 110/117,37(1),(3)कायद्याचे उल्लंघन-भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

COMMENTS