केवळ 2 तासांत आईस्क्रीम विकून मंत्र्याने कमावले साडेसात लाख रुपये

केवळ 2 तासांत आईस्क्रीम विकून मंत्र्याने कमावले साडेसात लाख रुपये

हैदराबाद – दिवसभर कष्ट करुनही दोन वेळच्या हातातोंडाची गाठ पडणे सामान्य माणसाला कठीण असते. पण तेलंगाणच्या एका मंत्र्याने केवळ 2 तासांत आईस्क्रीम विकून साडेसात लाख रुपयांची कमाई केली आहे. ही कामगिरी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री के. टी. रामाराव यांनी केली आहे.
आईस्क्रीमचा व्यवसाय रामा राव यांनी सुरू केला नाही. पण पुढील महिन्यात तेलंगणा राष्ट्र समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ते त्यासाठी निधी गोळा करत आहेत. कुतुबुल्लाहपूर येथील आईस्क्रीम पार्लरमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री असलेल्या के. टी. रामा राव यांनी ही आईस्क्रीमची विक्री केली. त्यांच्याकडून खासदार मल्ला रेड्डी यांनी 5 लाख रुपयांची आईस्क्रीम खरेदी केली. त्यानंतर श्रीनिवास रेड्डी यांनीदेखील 1 लाख रुपयांची आईस्क्रीम खरेदी केली.
ज्युस शॉपमधूनही रामा राव यांनी दीड लाख रुपयांची कमाई केली. शुक्रवारी पक्षाच्या सर्व नेत्यांनी निधी गोळा करण्यासाठी कुलीचे काम केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुख्यमंत्री तथा तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर राव यांनी गुलाबी कुली दिवसाचे आयोजन केले होते. याच 14 ते 20 एप्रिल दरम्यान पक्षाच्या नेत्यांनी किमान दोन दिवस काम करण्याचे त्यांनी आवाहन केले होते.

 

COMMENTS