कोलंबो ते वाराणसी थेट विमानसेवा चालू करणार – मोदी

कोलंबो ते वाराणसी थेट विमानसेवा चालू करणार – मोदी

कोलंबो : श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलंबोत आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध धर्माचा 14 वा आंतरराष्ट्रीय ‘वेसक डे’ मध्ये प्रमुख उपस्थिती लावली.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी ते कोलंबो विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले,’ भारत ही गौतम बुद्धांच्या शांततेचा संदेश देणारी भूमी आहे. तसेच भारत-श्रीलंकेचे मैत्रीपूर्ण संबंध हे गौतम बुद्धांच्या काळापासूनचं आहेत. त्यामुळं बुद्धांच्या भारत भूमीतून आपण श्रीलंकेतील जनतेसाठी शुभेच्छा घेऊन आल्याचे मोदी म्हणाले.

जगात आज शांती प्रस्‍थापित करणे खूप आव्‍हान ठरले आहे. हिंसाचार जगात वाढत चालला आहे. काही राष्‍ट्रे, देशांमध्‍ये आपसांत संघर्ष सुरु आहे. तेथे शांती रुजण्‍यासाठी वैश्‍विक शांती प्रस्‍थापित करणे गरजेचे आहे. यासाठी ईष्‍या, द्‍वेष आणि हिंसेचे मूळ नष्‍ट करायला हवे, असे म्हणत मोदी यांनी पाकिस्तानला टोला ही मारला.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांची ही भेट घेतली. तसेच मोदी यांनी बौद्ध सीमा मलाका मंदिराला भेट देऊन तेथे पारंपरिक दीप प्रज्ज्वलन समारंभात सहभागी होऊन मंदिरात पूजा केली.

COMMENTS