कोलकत्त्यात मोहन भागवतांच्या कार्यक्रमासाठी सभागृह देण्यास नकार !

कोलकत्त्यात मोहन भागवतांच्या कार्यक्रमासाठी सभागृह देण्यास नकार !

कोलकत्ता – कोलकाता येथील एका कार्यक्रमासाठी मोहन भागवत यांना राज्य सरकारने सभागृह देण्यास नकार दिला आहे. येत्या तीन ऑक्टोबरला  सिस्टर निवेदिता मिशन ट्रस्ट या संस्थेच्या वतीने भारताच्या राष्ट्रीय चळवळीत भगिनी निवेदिता यांचं योगदान  या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार  होते. या कार्यक्रमाला मोहन भागवत यांची विशेष उपस्थिती राहणार होती.  मोहन भागवत यांच्या सोबत पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथही सहभागी होणार होते.

सभागृहाच्या व्यापस्थापकांनी आधी या कार्यक्रमासाठी हे सभागृह उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली . मात्र आता सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम असल्याचे सांगत ही परवानगी रद्द करण्यात आली आहे. मोहन भागवत यांचा कार्यक्रम रद्द करण्यासाठीच बंगाल सरकार हे सभागृह जाणुनबुजून देत नसल्यास आरोप दक्षिण बंगालचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस जिश्नू बसू यांनी केलाय.  मात्र महाजाती सदनचे सचिव नुरूल हुदा यांनी या आरोपाचे खंडन केले आहे.

 

COMMENTS