ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनं खळबळ, देशभरात तीव्र संताप !

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनं खळबळ, देशभरात तीव्र संताप !

बंगळुरू – लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास हत्या करण्यात आली. लंकेश यांच्या बंगळुरूमधील राजेश्वरी गार्डन या भागातील राहत्या घरी त्यांची हत्या करण्यात आली. रात्री 8 च्या सुमारास तीन जण त्यांच्या घरी आले. आणि गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.

गौरी लंकेश यांच्या हत्येचे वृत्त कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. कर्नाटकाचे गृहमंत्री यांनीही तातडीने लंकेश यांच्या घरी जाऊन पाहणी केली. हत्येच्या तीव्र प्रतिक्रिया देशभर उमटत आहेत. विविध स्तरातून त्यांच्या हत्येचा निषेध केला जात आहे. हत्या करणा-यांना तातडीने पकडून कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. जावेद अख्तर, राहुल गांधी, शरद पवार, रेणूका शहाणे, मेधा पाटकर यांच्यासह अनेकांनी या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. सोशल मीडियातूनही हत्येवरून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

कोण होत्या गौरी लंकेश ?

गौरी लंकेश या ज्येष्ठ पत्रकार होत्या. लंकेश पत्रिका या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. गौरी यांचे वडील पी लंकेश यांचे वडील हे शिक्षक होते. मात्र 1980 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन लंकेश पत्रिका हे साप्ताहित सुरू केले. दलित, महिला, शेतकरी आणि समाजातील कमकुवत घटकांच्या अन्यायाला त्यामधून त्यांनी वाचा फोडली. त्यामुळे ते साप्ताहिक अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्ध झाले आणि नावारुपाला आले. पी लंकेश यांच्यानंतर गौरी लंकेश या त्याचं काम पाहत होत्या. पत्रकारितेसोबत त्या सामाजित कार्यातही अग्रेसर होत्या. धर्मनिरपेक्ष विचारसरणी मानणा-या गौरी लंकेश यांची हिंदुत्वावादाच्या टीकाकार म्हणूनही ओळख होती.

COMMENTS