कोल्हापुर : शिवसेना शहर कार्यालयावर हल्ला

कोल्हापुर : शिवसेना शहर कार्यालयावर हल्ला

कोल्हापूर – शिवसेनेतील गटबाजी आज पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. गट प्रमुखांच्या निवडीवरून झालेल्या वादावादीचे पर्यावसन शहर कार्यालयावरील हल्ला झाला आहे.

मिळालेली माहितीनुसार, कसबा बावडा येथे गट प्रमुखांची निवड करण्यात येत होती. त्यावरून आमदार राजेश क्षीरसागर आणि शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि त्यांचे कार्यकर्ते बावडा येथे पदाधिकारी निवडीसाठी गेले. बावड्यातून हे कार्यकर्ते परतल्यानंतर 30 ते 40 कार्यकर्त्यांनी लिंग्रस यांच्या घरावर हल्ला केला. या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नसून, सायंकाळी दुर्गेश लिंग्रस व त्यांच्या पत्नी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या गटाने हल्ला केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे.

 

COMMENTS