मुख्यमंत्र्यांचा आरे मट्रो कारशेडमध्ये 18 हजार कोटींचा घोटाळा –  संजय निरुपम

मुख्यमंत्र्यांचा आरे मट्रो कारशेडमध्ये 18 हजार कोटींचा घोटाळा – संजय निरुपम

मुंबई –  आरे कॉलनीत मुंबई मेट्रोचे कारशेड करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय निरुपम  म्हणाले, की मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी फक्त 12 हेक्टर जागा पुरेशी असते. मात्र मुख्यमंत्र्यांनी 30 हेक्टर जागेला मंजूरी दिली. उरलेली 12 हेक्टर जमीन विकासकाला देण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मेट्रो कारशेडसाठी उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांकडे मुख्यमंत्र्यांनी डोळेझाक केली. त्यांनी मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्यासाठी आग्रह का धरला, असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS