मुंबई – कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबाबत आज शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी सरकारच्या मंत्र्यांनी अंबाबाईचा उल्लेख महालक्ष्मी असा केल्याने राजेश क्षीरसागर यांनी संताप व्यक्त केला. अंबाबाई असताना तिचा महालक्ष्मी असा उल्लेख करुन सरकार आमच्या जखमेवर मीठ चोळत आहे असा आरोप क्षीरसागर यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या भ्रष्टाचारावर गेल्या अडीच वर्षांपासून काहीच कारवाई करत नसल्याबद्दल त्यांनी क्षीरसागर यांनी सरकारला जाब विचारला. गाभा-यातील आतले पुजारी लुटायचे आणि बाहेरचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अंबाबाईला घागरा चोळीचा वेश परिधान केला, पुजा-यांनी देवीचे डोळेही चोरलेत असाही आरोप क्षीरसागर यांनी केला. तरीही त्यांच्यावर कारवाई होत का नाही असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे सरकारने तातडीने अंबाबाई मंदिरात शासननियुक्त पुजा-याची नियुक्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी लवकरच कायदा करु असं आश्वासन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलं आहे. तीन महिन्यात हा कायदा करु असंही ते म्हणाले.
COMMENTS