डोक्यावरून मैला वाहण्याची अमानवीय प्रथा बंद करा, विरोधकांची मागणी

डोक्यावरून मैला वाहण्याची अमानवीय प्रथा बंद करा, विरोधकांची मागणी

मुंबई –  डोक्यावरून मैला वाहून नेण्याची अमानवीय प्रथा आजही पंढरपुरात सुरुच आहे. अशी कबुली आज विधानसभेत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.

यावेळी पंढरपुरात कायमस्वरुपी शौचालये बांधण्याची मागणी विरोधकांनी केली. यात्रे दरम्यान फॅॅब्रिकेटेड शौचालयांची व्यवस्था करूनही ती कमी पडत आहेत. सरकारने याविरोधात कायदा करूनही मैला वाहून नेण्याचे काम पंढरपुरात सुरूच आहे.  ही प्रथा कायमस्वरुपी बंद झाली पाहिजे अशी मागणी विधानसभेत  करण्यात आली.

 

COMMENTS