खासदारांच्या बैठकीत धनगर आरक्षणाची चर्चा नाही – खा. विकास महात्मे

खासदारांच्या बैठकीत धनगर आरक्षणाची चर्चा नाही – खा. विकास महात्मे

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चर्चादेखील झाली नसताना सभेत आरक्षणाला विरोध झाल्याचे वृत्त प्रसारित झाले. हे प्रसारित झालेले वृत्त खोटे आहे, असे खासदार आणि धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी म्हटले आहे.
खासदारांच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा आला नाही, मात्र हे सरकार धनगर आरक्षणाच्या मुद्यावर सकारात्मक असून त्या संदर्भात पावले उचलत आहे. धनगर समाजाने चुकीच्या बातम्यांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी समाजाला केले. पंतप्रधान मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीला आपण स्वतः उपस्थित असल्याचे ही महात्मे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रसिद्धी माध्यमात आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. खोटी बातमी दिल्याबद्दल राज्यसभेत  विशेषाधिकार भंगाची सूचना देणार असल्याचे ही महात्मे यांनी स्पष्ट केले. गेल्या ६५ वर्षात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कधी नव्हे ते  पुढे सरकत आहे. आघाडी सरकारने केलेल्या चुका हे सरकार निस्तरत आहे. समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने प्रसिद्ध टाटा सामाजिक विज्ञान संस्था संशोधन करत असून लवकरच याबाबतचा अहवाल येईल. त्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी केंद्राकडे करण्यात येणार असल्याचे महात्मे यांनी सांगितले.

 

COMMENTS