खासदार उदयनराजे भोसले यांना होणार अटक ?

खासदार उदयनराजे भोसले यांना होणार अटक ?

सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज (दि.19) फेटाळला आहे. भोसले यांच्यावर लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलॉईज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

सातारा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. खा. भोसले यांच्या विरोधात 22 मार्चला सातारा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा 9 साथीदारांना पोलिसांनी अटक करून सातारा जिल्हा न्यायालायात हजर केले होते. या सर्वांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. मात्र, उदयनराजे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर  भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्यानंतर  भोसले यांच्याकडे केवळ सुप्रीम कोर्टाचा पर्याय शिल्लक आहे. मात्र तूर्तास उदयनराजे भोसलेंना याप्रकरणात कधीही अटक होऊ शकते.

 

COMMENTS