औरंगाबाद – जिल्ह्यात सध्या कन्नड तालुक्यातल्या ‘त्या’ 6 गावांची खुमासदार चर्चा रंगली आहे. त्या सहा गावांची थेट पोलिसांत तक्रारही दाखल झाली आहे. त्याचं झालं असं शिवसनेचे मराठवाड्यातले मोठे नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विकास निधीतून कन्नड तालुक्यातल्या ‘त्या’ सहा गावातं विकास निधी देण्यात आला आणि तो खर्चही करण्यात आला. कन्नड तालुक्यातील खापेश्वर, झाडेगावतांडा, सावरखेडा, मांडवा, शिंदेवाडी आणि घोडेगाव या गावांना चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीतून पैसे देण्यात आले आणि ते खर्चही करण्यात आले. मग तुम्ही म्हणाल त्यात काय नवल आहे. अहो इथ तर गंमत आहे. वरील जी 6 नावं सांगितली आहेत, ती गावं कन्नड तालुक्यात अस्तित्वातच नाहीत. मग पैसा कुठे गेला आणि कशाचा विकास झाला याचा लोक जाब विचारत आहेत. मग अशाच एका व्यक्तीने आता कन्नड पोलिसांत ही 6 गावे हरवल्याची आणि ती शोधून देण्याची तक्रार दाखल केलीय. आहे ना गंम्मत…
COMMENTS