खासदार रविंद्र गायकवाड यांची एअर इंडियाच्या अधिका-याला मारहाण

खासदार रविंद्र गायकवाड यांची एअर इंडियाच्या अधिका-याला मारहाण

नवी दिल्ली – शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिका-याला मारहाण करण्याची घटना घडलीय. गायकवाड यांनी मारहाण केल्याची कबुलीही दिलीय. खासदार गायकवाड हे पुण्यातून दिल्लीला जात होते. त्यांचे तिकीट बिझनेस क्लासचे असतानाही त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसवले. त्यामुळे दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा जाब विमानातील अधिका-यांना विचारला. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट एअर इंडियाच्या अधिक-याने अरेरावीची भाषा केली. त्यामुळे आपण त्याला चप्पलने बडवले असंही रविंद्र गायकवाड यांनी सांगितले आहे. या प्रकरणामुळे एअर इंडियातल सोई सुविधांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

COMMENTS