खासदार संजय काकडेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

खासदार संजय काकडेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पुणे  – न्यू कोपरे येथील जमीन विकसनात फसवणूक केल्याच्या आरोपा खाली न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक आणि खासदार संजय काकडे यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. 

काकडे यांच्यासह त्यांचे भाऊ सूर्यकांत काकडे, अशोक यादव आणि काकडे कन्स्ट्रक्‍शन कंपनीविरुद्ध दिलीप मोरे यांनी न्यायालयाकडे तक्रार केली होती. मोरे यांच्यातर्फे ऍड. नारायण पंडित आणि ऍड. सुरेखा वाडकर यांनी बाजू मांडली होती. पुनर्वसन योजनेतंर्गत राज्य सरकारने न्यू कोपरे येथील जागा ग्रामस्थांना दिली होती. या 38 एकर जमिनीपैकी 14 एकर जमिनीसंदर्भात ग्रामस्थांनी काकडे यांच्याशी विकसन करार केला होता. उर्वरित जमीन काकडे यांनी “करेक्‍शन डीड’ करून बळकाविली, विकसन करारानुसार प्रथम ग्रामस्थांना घर न देता व्यावसायिक बांधकाम केले, तीन वर्षांच्या मुदतीत घराचा ताबा दिला नाही, 433 पैकी 81 जणांना घरांचा ताबा दिला नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई दिली गेली नाही, अशी तक्रार न्यायालयाकडे केली गेली होती.

याप्रकरणी आता खासदार संजय काकडे यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल  करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

COMMENTS