सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे भोसले यांना अटक होण्याची शक्यता आहे.
एका कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. उदयनराजे व इतर 9 जणांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .
न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर उदयनराजेंना पोलीस अटक करु शकतात. सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
COMMENTS