पुणे: नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे: नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे –  वाहतुकीचे नियम तोडल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी अमोल बालवडकर यांच्या गाडीवर जॅमर लावून कारवाई केली. आपल्या गाडीवर कारवाई केल्याचा राग नगरसेवकांना आल्याने त्यांनी वाहतूक पोलिसांना दमदाटी करून ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे.

नगरसेवक बालवडकर यांनी त्यांची कार जंलगी महाराज रोडवर नो-पार्किंगमध्ये लावली होती. या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर डामसे हे नो-व्हॉल्टींग बाबत विशेष कारवाई करत होते. डामसे यांनी चालक गणेश चौधरी याला नो-पार्किंगमधून गाडी काढण्यास सांगितले. त्यावेळी त्याने पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. डामसे यांनी गाडीला जॅमर लावून पुढील चौकात कारवाईसाठी गेले. त्यावेळी अमोल बालवडकर यांनी आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करून डामसे यांना फोन करून गाडीवर कारवाई करण्यास मनाई केली. परंतु वाहतुकीचा नियम तोडल्यामुळे कारवाई केल्याने डामसे यांनी त्यास नकार दिला. चिडलेल्या नगरसवेकांनी तुम्हाला पाहून घेतो, असे म्हणून डामसे यांना दमदाटी केली. तसेच चालक गणेश चौधरीला त्याचे नाव विचारले असता त्याने प्रशांत शंकर मोटे असे खोटे नाव पोलिसांना सांगितले.

डामसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशीरा शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये कलम 353 अंतर्गत नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS