खा. गायकवाडांना एअर इंडियाचा पुन्हा दणका, मुंबई ते दिल्ली प्रवासाचे तिकिट केले रद्द

खा. गायकवाडांना एअर इंडियाचा पुन्हा दणका, मुंबई ते दिल्ली प्रवासाचे तिकिट केले रद्द

उस्मानाबादचे शिवसेना खासदार गायकवाड यांचे मुंबई-दिल्ली विमान प्रवासाचे तिकीट पुन्हा एकदा रद्द केले आहे. बुधवार सकाळची गायकवाड यांची मुंबई ते दिल्ली प्रवासाची तिकीट एअर इंडियाने रद्द केली.

एअर इंडियाच्या मॅनेजरला मारहाण केल्यानंतर वादात सापडलेले सेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांना पुन्हा एकदा एअर इंडियाने दणका दिला आहे. गायकवाड यांचे मुंबई-दिल्ली विमान प्रवासाचे तिकीट पुन्हा एकदा रद्द केले आहे. बुधवार सकाळची गायकवाड यांची मुंबई ते दिल्ली प्रवासाची तिकीट एअर इंडियाने रद्द केली. मागच्या आठवडयात रविंद्र गायकवाडांनी एअर इंडियाचे मॅनेजर आर. सुकूमार यांना चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियासह अन्य भारतीय विमान कंपन्यांनी त्यांचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश केला आहे.

मॅनेजरला केलेल्या मारहाणीनंतर रविंद्र गायकवाड यांच्यावर देशातील इतर कंपन्यांनीही देशातंर्गत विमान प्रवासावर बंदी आली आहे. रविंद्र गायकवाडांनी आपल्या वर्तनाबद्दल माफी मागायला नकार दिला. मी का माफी मागू ? असा उलटा प्रश्न त्यांनी केला. बिझनेस क्लास ऐवजी इकोनॉमी क्लासमध्ये बसवल्याच्या रागातून रविंद्र गायकवाडांनी सुकूमार यांना मारहाण केली होती. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, शिवसेनेने गायकवाड यांची बाजू लावून धरली आहे. आज (मंगळवारी) शिवसेना नेत्यांनी विमान कंपन्यांविरोधात हक्क भंग दाखल केला आहे.

COMMENTS