नारायण राणे भाजपच्या वाटेवर नाहीत – नितेश राणे

नारायण राणे भाजपच्या वाटेवर नाहीत – नितेश राणे

नारायण राणे भाजपच्या वाटेवर या बातमीत काहीही तथ्य नाही.  व्यक्तिगत कामांसाठी ते दिल्लीला गेले होते. असं कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे म्हणाले की, मी छातीठोकपणे सांगतो की आम्ही काँग्रेसमध्येच आहोत. आमच्याबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार केले जाते आहे. आमची भावना आहे की राणे साहेबांनी काँग्रेस पक्ष मोठा करावा. पंजाब प्रमाणे महाराष्ट्रही काँग्रेस पक्ष सत्तेत यावा यातही पक्षाचा कार्यकर्ता आणि राणे कुटुंबीय म्हणून आम्ही बोलत आहोत. पक्ष वाढवायचाय, वाचवायचा म्हणून बोलत आहोत. आमच्या विरोधात अविश्वासाचे वातावरण तयार करणा-यांबाबत मी पुरावे नसताना कसे बोलू ? आणि पुरावे असतीलच तर ते मी पक्षाच्या व्यासपीठावर मांडेन.

मला राज ठाकरे यांची भाषण शैली आवडते म्हणून मी मनसेत प्रवेश करणार का ? मला शरद पवार यांचे व्यक्तिमत्व प्रभावित करते म्हणून मी राष्ट्रवादीत जाणार आहे का ? चंद्रकांत पाटील यांनी राणे साहेबाबद्दल चांगले मत व्यक्त केले हे आजच्या समाजामध्ये चूक आहे असंच आता यानिमित्तानं म्हणावे लागेल.

राजकारणात जर-तर ला अर्थ नसतो. आज काय त्याला महत्व. मला लोकांनी काँग्रेसचा आमदार म्हणून निवडून दिलेय.पंजाबमध्ये जसे लढलो तसे महाराष्ट्रातही शक्य आहे. फक्त सर्व एकसंघ असण्याची गरज आहे. तसे झाले तर 2019 ला काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवू शकतो.राजकीय भूकंपाचे सूतोवाच राणे साहेबांना त्यांच्या शैलीने करावे लागतात. आम्ही कधीही बोललो नाहीये की आम्हला काँग्रेस सोडायची आहे.

मी उद्या संघर्ष यात्रेत सहभागी होणार असून राणे साहेब सहभागी होणार नाहीत. विरोधी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सभागृहात आवाज उठवतील आणि विधानसभेचे आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होतील ही व्यूहरचना आधीच ठरलेली आहे. आज आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, भविष्यात काय होईल यासाठी ज्योतिषी पकडावा लागेल. काँग्रेस सोडण्याचा विचार आज मनातही नाही. आम्ही रिझल्ट देत आहोत, पक्ष मजबूत व्हावा यासाठी बोलत आहोत. जे बोलत नाहीत त्यांना कदाचित पक्षाच्या भवितव्याची चिंता नसावी. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी राणे साहेबांच्या संपर्कात आहेत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आमच्या मतांची योग्य दखल घेतली जाईल. काँग्रेस म्हणून आम्ही एकत्र आहोत. असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS