गरबा पाहिला म्हणून गुजरातमध्ये दलित तरुणाची हत्या !

गरबा पाहिला म्हणून गुजरातमध्ये दलित तरुणाची हत्या !

आनंद – दस-याच्या दिवशी गुजरातमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गरबा पहायला आला म्हणून म्हणून एका दलित तरुणाची हत्या करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानंही याबाबतचं वृत्त दिलं आहे. 21 वर्षाचा दलित तरुण जयेश सोळंकी हा त्याचा चुलतभाऊ आणि काही मित्रांसह सोमेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी गरबा बघण्यासाठी गेला होता. त्यावेळी काही जणांच्या टोळक्यानं त्यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये जयेशचा मृत्यू झाला आहे. जयेशच्या चुलत भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

COMMENTS