गर्भवती महिलांनी मटण खाऊ नये, सेक्स करु नये, सरकारचा अजब सल्ला

गर्भवती महिलांनी मटण खाऊ नये, सेक्स करु नये, सरकारचा अजब सल्ला

दिल्ली – केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानं एक अजब सल्ला गर्भवती महिलांना दिला आहे. सदृढ बालकाला जन्म देण्यासाठी गर्भकाळात तुम्ही कोणताही मांसाहार करु नका, या काळात सेक्स करु नका. गर्भवती महिलांनी त्यांच्या खोलीमध्ये सुंदर फोटो लावावेत, चांगले विचार करावेत असे एक नव्हे अनेक अफलातून सल्ले मंत्रालयानं दिले आहेत. केंद्र सरकारच्या या अफलातून सुचनेला कोणताही वैज्ञानीक आधार नाही. त्यामुळे सरकारणे कशाच्या आधारावर हा सल्ला दिला असा प्रश्न आहे. या अजब सल्ल्यावर टीका सुरू झाल्यानंतर आयुष मंत्रालय काहींस बॅकफूटवर आलंय.  महिलांना आम्ही ऐच्छिक सल्ला दिला आहे, ते पाळण्याचं बंधन नसल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलंय. मोदी सरकारच्या गर्भवती महिलांसाठी सूचनांच्या या प्रसिद्धीपत्रकामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंत्रालयाच्या आयुष प्रीस्क्रिप्शनने गर्भवती महिलांना हा सल्ला दिला आहे. गर्भवती महिला सृदृढ बाळाला जन्म द्यायचा असल्यास त्यांनी कटाक्षानं घाणेरडे विचार आणि मांस खाणे टाळलं पाहिजे. तसेच गर्भवती असताना सकारात्मक आणि शुद्ध विचार करण्याची गरज आहे, असंही आयुष प्रीस्क्रिप्शनने म्हटलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आयुष प्रीस्क्रिप्शनमध्ये जवळपास दरवर्षी 2.6 कोटी मुलं जन्माला येतात. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं असून, ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परदेशात निघून गेले आहेत.

COMMENTS