‘गांधी’ वरुन काँग्रेस राष्ट्रवादी एकवटले, सरकावर एकत्र हल्लाबोल !

‘गांधी’ वरुन काँग्रेस राष्ट्रवादी एकवटले, सरकावर एकत्र हल्लाबोल !

 

मुंबई – गांधी घरण्यावर थोडसं जरी काही कोणी बोललं तर काँग्रेसवाले लगेचच विरोधकांवर तुटून पडतात. आणि ते साहजिक आहे. आज मात्र काँग्रेस सोबत राष्ट्रवादीचे नेतेही सरकारवर तुटुन पडले.

नववीच्या इतिहासातील इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह मजकूराबद्दल विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे देशासाठी मोठे योगदान दिले आहे. मात्र इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याबद्दल नववीच्या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला आहे. तो तातडीने वगळण्यात यावा आणि त्याची घोषणा आजच करावी अशी मागणी विखे पाटील यांनी देली

राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनीही इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तो वादग्रस्त मजकूर तातडीने वगळावा अशी मागणी पवार यांनी केली. इंदिरा गांधींची ओळख पोलादी स्त्री म्हणून होती. त्यांच्या काळात अनेक चांगले निर्णय घेतले. त्यामुळे आक्षेपार्ह मजकूर काढून टाका अशी मागणी त्यांनी केली.

यावर शिक्षण मंडळ स्वायत्त आहे. त्याचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आहेत. असं सांगत जबाददारी झटकण्याचा प्रयत्न केला. तसंय शिक्षणमंत्री योग्य तो निर्णय घेतली आणि त्याबाबत निवेदन करतील असंही बापट म्हणाले.

COMMENTS