एका गायिकेचा आणि नेत्याचा अश्लिल व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट, व्हॉटसअॅप ग्रुप आणि पोर्न साइटवर टाकणाऱ्या लुधियानातील काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षाला अटक केली आहे. मोहन सिंग असे या काँग्रेस उपाध्यक्षाचे नाव आहे.
मोहन सिंग हा चंदीगड रोडवरील गुरू तेगबहादूर नगरात राहतो. तो स्वत: प्रॉपर्टी डिलर असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्याचा सक्रिय सहभाग होता. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची नावे घोषित झाल्यानंतर काही वेळातच हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाला होता.
याप्रकरणी सदर गायिकेने लगेचच लुधियाना पोलीस आयुक्तांना भेटून तक्रार नोंदविली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मोहन सिंह याने ‘टायगर ग्रुप’ नावाच्या व्हॉटसअपवरील एका ग्रुपमध्ये हा व्हिडिओ व्हायरल केला होता.
COMMENTS