कचरा डेपो बंद न झाल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देईन- विजय शिवतारे

कचरा डेपो बंद न झाल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देईन- विजय शिवतारे

पुणे – उरुळी देवाची आणि फुरूसुंगी येथील कचरा डेपो बंद न झाल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देईन,  तसेच 15 दिवसांत ऍक्शन झाली नाही तर मी येथे येऊन बसणार, असा इशारा शिवसेना नेते आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.

पुण्यातील कचरा प्रश्नाचा आज 22 दिवस आहे. अजूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आता कचरा डेपो बंद न झाल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देईन, असा इशारा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला आहे. पुण्यातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी शिवतारे यांनी आज ग्रामस्थांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यातील कचरा प्रश्न पेटला आहे. उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये गेल्या 21 दिवसांपासून पुण्यातील कचरा टाकून दिला जात नाही. ग्रामस्थांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. कचरा डेपो बंद करा, अशी त्यांची मागणी आहे. पुण्यातील निर्माण झालेली ही कचराकोंडी फोडण्यासाठी स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री शिवतारे यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. मात्र, कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीवरून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यावर उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपो कायमस्वरुपी बंद न झाल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देईन, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, पुण्याच्या कचराकोंडी प्रश्नी विजय शिवतारे यांनी आज ठरल्याप्रमाणे फुरसुंगी गावात पोहोचले. पण शिवतारे यांनी मध्यस्थी करण्यासाठी फुरसुंगीवासीयांच्या आंदोलनस्थळाला भेट देत चर्चा केली मात्र भुरसुंगीवासीयांचं मनपरिवर्तन करता आलं नाही. कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून, त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन सुरू केले आहे.

आमच्याशी कुठलीही चर्चा न करता कोणत्या आधारे शिवतारेंनी घोषणा केली अशी नाराजी ग्रामस्थांनी उपस्थिती केली. शिवतारे यांनी कौन्सिल हॉलला बैठकी बोलावली. पण फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांचा उपस्थित रहायला साफ नकार दिला. काळ्या पटट्या लावून मौन आंदोलन सुरूच ठेवलंय.तसेच यापुढील चर्चा फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच केली जाईल, असा पवित्राच ग्रामस्थांनी घेतला आहे.

COMMENTS