गायींच्या ‘आधार कार्ड’चा खर्च कोण करणार? –  दिग्विजय सिंह

गायींच्या ‘आधार कार्ड’चा खर्च कोण करणार? – दिग्विजय सिंह

गायींची आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी तस्करी रोखण्यासाठी गायींचे आधार कार्ड काढण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. यावरुन काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

गायींच्या ‘आधार कार्ड’चा खर्च कोण करणार? असा सवाल त्यांनी मोदी सरकारला केला आहे. आज (मंगळवारी) दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरुन भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. गाय आणि म्हशींचे आधार कार्ड काढले जाणार,  यावर किती खर्च होणार? आणि याचे कंत्राट गोरक्षकांना देणार का?, असा सवाल त्यांनी केला आहे. गायींचे आधार कार्ड तयार केल्यावर मुस्लिमांना गोरक्षकांपासून संरक्षण मिळणार का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

COMMENTS