गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा – अजित पवार

गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा – अजित पवार

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित रहाणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन याना चांगलेच महागात पडणार आहे. विरोधकांनी याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर  हल्लाबोल केला आहे.

शरद पवार यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा भाजपने आरोप केला होता. आता त्यांच्याच पक्षातील मंत्री दाऊदच्या नातेवाईकाकडे लग्नाला जातात. ही गंभीर चूक असून गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले आहे.

पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यानंतर ते बोलत होते.

जेव्हा एखादा मंत्री कुठल्या लग्न समारंभात अथवा कार्यक्रमाला जातो. तेव्हा पोलीस आयुक्त कोणाचा कार्यक्रम आणि त्याठिकाणी कोणाची उपस्थिती आहे, याबद्दलची माहिती देतात. मग गिरीश महाजन यांना माहिती देण्यात नव्हती आली काय ? असा सवाल ही अजित पवार यांनी उपस्थित केला.

 

COMMENTS