बाबरी मशीद प्रकरण: अडवाणी, जोशी, उमा भारती यांना हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

बाबरी मशीद प्रकरण: अडवाणी, जोशी, उमा भारती यांना हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

बाबरी मशीद प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणातील सर्व आरोपींना 30 मेपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेशात म्हटले आहे.

बाबरी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयच्या विशेष न्यायालयात रोज सुनावणी सुरु आहे. आज झालेल्या सुनावणीत सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांना 30 मे किंवा त्यापूर्वी न्यायालयासमोर राहण्याचे आदेश दिले आहे. बाबरी मशीद प्रकरणातील महंत नृत्यगोपाल दास, महंत रामविलास वेदांती, वैकुंठलाल शर्मा उर्फ प्रेमजी, चंपत राय बन्सल आणि धर्मदास हे सहा जण 20 मेरोजी लखनौतील सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर शरण आले होते. यातील पाच जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांनादेखील मंगळवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

COMMENTS