गुजरातमध्ये जीएसटी विरोधात व्यापारी रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज

गुजरातमध्ये जीएसटी विरोधात व्यापारी रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज

देशात एक करप्रणाली अर्थात जीएसटी लागू करण्यात आला आहे . मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच गुजरातमध्ये व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात बंद पुकारला आहे.
सुरतमध्ये कापड मार्केट बंद करुन व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाला. पण सूरतचे कापड आणि दुसरे व्यापारी जीएसटीला पूर्वीपासूनच विरोध करत होते. जीएसटी हटवून सोपी करप्रणाली आणावी, अशी मागणी व्यापारी करत आहेत.

 

 

COMMENTS