‘GST’ मुळे राज्य सरकारने वाढवला वाहन नोंदणीवरचा कर

‘GST’ मुळे राज्य सरकारने वाढवला वाहन नोंदणीवरचा कर

वाहन नोंदणीसाठी घेतल्या जाणाऱ्या एकरकमी मोटार वाहन करात वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. जीएसटी लागू झाल्याने महसूल तूट होणार आहे तेव्हा उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे.

वाहनाच रजिस्ट्रेशन करताना जो कर घेतला जातो तो आता 2 टक्के वाढणार आहे. सर्वच वाहनांसाठी कमाल कर मर्यादा 20 लाख ठेवण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. दुचाकी आणि तीनचाकीवरील कर 8 ते 10 टक्के या दरम्यान होता. त्यामध्ये वाढ होऊन आता 10 ते 12 टक्के कर लागणार आहे. पेट्रोल कारवरील कर 9 ते 11 टक्के या दरम्यान होता,  तो आता 11 ते 13 टक्के कर होणार आहे.  डिझेल कारवरील कर 11 टक्के ते 13 टक्के या दरम्यान होता. त्यावर आता 13 ते 15  टक्के याप्रमाणे कर लावण्यात येणार आहे. सी.एन.जी. आणि एल.पी.जी. कारवरील कर 5 ते 7 टक्के या दरम्यान होता तो आता 7 ते 9 टक्के होणार आहे.

जास्त किंमत असणारी वाहने राज्याबाहेर नोंदणी आणली जातात. हे टाळण्यासाठी सर्वच वाहनांसाठी मोटार वाहन कराची उच्चतम कर मर्यादा 20 लाख रुपये एवढी ठेवण्यात येणार आहे.

 

COMMENTS