गुजरातमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय. बनासकांठा येथे काही वेळापूर्वीच अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्यात. तसंच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
राहुल गांधी आज बनासकांठा येथील पुरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गुजरात दौऱ्यावर पोहचले होते. यावेळी पुरग्रस्तांशी संवाद साधत असताना आपल्याला कितीही काळे झेंडे दाखवले तरी आपण त्याला घाबरणार नाही असं राहुल गांधींनी ठणकावून सांगितलं. राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्यात. यावर राहुल गांधी यांनी अशा लोकांना काळे झेंडे दाखवू द्या, त्यामुळे काही फरक पडणार नाही. ही घाबरलेली लोकं आहे असं आवाहनच आपल्या कार्यकर्त्यांना केलं.
काँग्रेसने या हल्ल्याला भाजपला जबाबदार धरलंय. काही वेळापूर्वीच भाजपच्या काही गुंड कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असा आरोप काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय. या हल्ल्यात आमचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
#Visuals Congress Vice President Rahul Gandhi's car attacked by unknown persons in Gujarat's Banaskanta pic.twitter.com/AXsgCM4Tlq
— ANI (@ANI_news) August 4, 2017
COMMENTS