महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने राज्य लावणी महोत्सवाकडे पाठ फिरवलीय….

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने राज्य लावणी महोत्सवाकडे पाठ फिरवलीय….

महाराष्ट्राची लोकपरंपरा म्हणून लावणीची ओळख आहे. साहित्य, संगीत, अभिनय यांचा एकत्रित संगम लावणी मधून पहावयास मिळतो. या लोककलेची जपणूक करीत असलेल्या कलावंतांना आपली कला राज दरबारी सादर करण्याची संधी मिळावी म्हणून शासनाने राज्य लावणी महोत्सव सुरू केला. मात्र गेली तीन वर्षे झाले लावणी महोत्सव झालाच नाही.

आघाडी सरकारच्या काळात दर वर्षी शासन राज्य लावणी महोत्सव घेत होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक कला केंद्र सहभाग घेत होते. शासन दरबारी आपली कला सादर करण्यासाठी वाव मिळत असल्याने कलावंताना हुरूप यायचा या मोहत्वाची उत्सुकता त्यांना असायची, लावणी महोत्सव जवळ येताच रियसली व्हायच्या, नवनवीन  लावण्या तयार व्हायची… कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्यश्रृंगारासाठी लागणारे अलंकार नव्याने खरेदी करायचे. नव्या उमेदीने, नव्या जोशात लावणी महोत्सवात सहभागी व्हायचे. जसे राज्यात देवेंद्रजींचे सरकार आलेय तसा शासनाचा लावणी महोत्सवाचा दरबार भरलाच नाही. असे अध्यक्ष अशोक जाधव म्हणाले.

दोन वर्षे खंड पडल्यानंतर यंदा राज्य लावणी महोत्सवा होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाने कला पथकांना कळविले त्याची तारीख एप्रिल महिन्यातील पाच, सहा, सात अशी जाहिर ही केली.मात्र त्या दिवशी कलावंताना लावणी महोत्सव पुढे ढकल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे त्या दिवशी लावणी महोत्सवाचा विडा रंगलाच नाही.त्यामुळे कलावंतानी केलेले परिश्रम, अलंकार शृंगारावर केलेला खर्च वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

COMMENTS