गुजरात राज्यसभा निवडणूक; काँग्रेसच्या तक्रारीनंतर मतमोजणी थांबवली

गुजरात राज्यसभा निवडणूक; काँग्रेसच्या तक्रारीनंतर मतमोजणी थांबवली

काँग्रेसच्या दोन आमदारांविरोधात काँग्रेसनेच तक्रार केल्याने गुजरात राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी थांबवली आहे. आपल्या दोन आमदारांनी गोपनीयतेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे सध्या मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंत सिंह यांना तर काँग्रेसकडून सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शाह आणि इराणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

दरम्यान, पटेल यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस शर्थीचे प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपावरुन काँग्रेसने पक्षाच्याच दोन आमदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मतमोजणी सध्या थांबवण्यात आली आहे.

 

COMMENTS