भाजपचा चाणाक्य हरला, काँग्रेसचा जिंकला, अहमद पटेल यांची सरशी !

भाजपचा चाणाक्य हरला, काँग्रेसचा जिंकला, अहमद पटेल यांची सरशी !

साम दाम दंड या सर्व मार्गांचा वापर करत काँग्रेसच्या चाणाक्याचा गेम करण्याच्या नादात भाजपनंच स्वतःचं हसू करुन घेतलं. भाजपच्या चाणक्याला पराभवाची चव चाखावी लागली. विधान सभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला घायाळ करण्यासाठी अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडणा-या भाजपच्या अध्यक्ष अमित शहा यांना त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी धडा शिकवला.  भाजपच्या एका आमदारानं आपण पाटीदार समाजाच्या युवकांच्या बलिदानाच्या निषेधार्थ भाजपला मतदान केले नाही असं फेसबूकवर पोस्ट टाकली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी काल मतदान झालं. तीन जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात होते. भाजपनं काँग्रेसचे उमेदवार गळाला लावण्याचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आलं. मात्र मतदान करताना काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतदान केल्यानंतर ते अमित शहा यांना दाखवलं. त्यावर काँग्रेसनं हरकत घेतली. आणि निवडणुक आयोगानं  त्या दोन काँग्रेसच्या आमदरांचं मतदान रद्द केलं. राष्ट्रवादीच्या एका आमदारानं आणि जेडीयूच्या एका आमदारानं काँग्रेसला साथ दिली. तर भाजपच्याही एका आमदारानं काँग्रेसला मतदान केलं.

COMMENTS