गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेलचा कॉंग्रेसला पाठिंबा

गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेलचा कॉंग्रेसला पाठिंबा

गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा देणार असल्याचं पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने सांगितलं आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पाटीदार समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे असे त्याने  हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले.

पाटीदार समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि सरकारी नोकरी व शिक्षण क्षेत्रात आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान मी राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. या भेटीत सकारात्मक चर्चा होईल आणि आमच्या मागण्या मान्य केल्या जातील असा विश्वास हार्दिक पटेलने व्यक्त केला. या भेटीनंतर कॉंग्रेसला पाठिंबा देण्याबाबत अधिकृत घोषणा करू असं त्याने सांगितले आहे.

COMMENTS