गुडन्यूज – सेवानिवृत्तीनंतर लगेच मिळणार पेन्शन आणि  पीएफ !

गुडन्यूज – सेवानिवृत्तीनंतर लगेच मिळणार पेन्शन आणि  पीएफ !

आता कर्मचा-याला आपल्या सेवानिवृत्तीनंतर वेतन आणि भविष्यनिर्वाह निधी मिळवण्यासाठी मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत असे. हे सर्व लक्षात घेता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने क्षेत्रीय कार्यालयांना सेवानिवृत्तीनंतर लगेचच पीएफ आणि पेन्शन देण्याचे आदेश जारी केले आहेत.

ईपीएफओच्या माध्यमातून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कर्मचारी भविष्य निधी योजना, 1952 आणि कर्मचारी पेन्शन योजना, 1995 च्या सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर लगेचच भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतन देण्यात यावे, असे आदेश यामध्ये देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कर्मचाऱयांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

COMMENTS