गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नारायण राणेंना भाजपने घेऊ नये – दीपक केसरकर

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नारायण राणेंना भाजपने घेऊ नये – दीपक केसरकर

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि भ्रष्ट नारायण राणे यांना भाजपने घेऊ नये, असा सल्ला शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपला दिला आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जालन्यात केसरकर बोलत होते. 

‘निवडणुकीत जनतेचा फटका दोन-तीन वेळा मिळूनही राणे सुधारलेले नाहीत. आपण महाराष्ट्राला काय देऊ शकतो, त्यापेक्षा मला काय मिळणार होते आणि ते मला न मिळाल्यास मी काय करु शकतो. ही पैशाच्या जोरावर चालणारी गुर्मी आहे. राणेंची ही गुर्मी महाराष्ट्रातील जनताच उतरवू शकते,’ असे केसरकर म्हणाले.

COMMENTS