गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमात झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी चक्क महिलांकडूनच पाय धुवून घेतले व प्रसन्न चेहऱ्याने त्यांनी महिलांचे आभारही मानले. विशेष म्हणजे दास यांनी या कार्यक्रमानंतर टि्वट करून धन्य झाल्याचं म्हटलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याने स्वतःला गुरूस्थानी ठेवून जनतेकडून पाय धुवून घेण्याच्या या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री दास एका मोठ्या ताटात उभे राहिलेले दिसत असून दोन महिला जमीनीवर बसून त्यांचे पाय धुवत आहेत. या महिला गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी मुख्यमंत्र्यांच्या पायावर टाकत पाय धुवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ जमशेदपूरच्या ब्रह्मा लोकधाम येथे आयोजित कार्यक्रमातील आहे. गुरु महोत्सवानिमित्त या कार्यक्रमात मुख्यमंत्री रघुबर दास यांचे प्रमुख पाहुणे म्हणून अशा स्वरुपात स्वागत करण्यात आले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधीपक्षांनी मुख्यमंत्री दास यांच्यावर जोरदार टीका करीत त्यांनी महिलांचा अपमान केल्याचे म्हटले आहे.
#WATCH: Women wash feet of #Jharkhand CM Raghubar Das on a 'Guru Mahotsav' event held at Jamshedpur's Brahma Lok Dham. (July 7) pic.twitter.com/86wUeIpKzh
— ANI (@ANI_news) July 9, 2017
COMMENTS