गूड न्यूज – पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले !

गूड न्यूज – पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले !

मुंबई – केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने राज्यातील इंधनावरचा सरचार्ज कमी केल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल 67 पैसे ते 1 रुपया 77 पैसे स्वस्त झाले आहे. तर डिझेल 1 रुपया 25 पैसे ते 1 रुपया 66 पैशांनी स्वस्त झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.  ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी ही माहिती दिलीय. राज्यात वस्तू व सेवा कर रद्द झाल्यामुळे त्याचा इंधनावर पेट्रोलियम कंपन्यांनी लावलेला स्टेट स्पेसिफिक सरचार्ज रद्द करावी, अशी मागणी राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री श्री. बापट यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली होती. ही मागणी विचारात घेऊन केंद्रीय मंत्री श्री. प्रधान यांनी स्टेट स्पेसिफिक सरचार्ज पाच दिवसात रद्द करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर डिझेल आणि पेट्रोल स्वस्त झाले आहे.

COMMENTS